#व्हॅलेंटाईनडे!.... #असाही!

#स्मितानुभव #कथास्पर्धा_2 स न वि वि फेसबुक ग्रुपवर कथा स्पर्धा होती. ह्या थीम प्रमाणे कथा पुढे न्यायची होती. भयकथा किंवा प्रेमकथा ********************** प्रेयसी प्रियकराला हॉलच्या बाहेर घेऊन येते... क्लिंक क्लिंक शॅम्पेन ग्लासेस अलगद एकमेकाला टेकतात.. आत मेक्सिकन शफल च्या धुंद orchestra वर युगुलं चा चा चा किंवा जाइविंग किंवा फॉक्स ट्रॉट नृत्यात मश्गुल झाली आहेत... अचानक प्रेयसी खूप घाबरल्यासारखी करते... त्याच क्षणी आत ऑर्केस्ट्रा ड्रमवाला सिम्बलसचा झणझणा आवाज करतो... *********** कथापूर्तीची थीम मिळाली आणि मी सर्व आशा सोडून दिल्या. त्यातील शब्दच माहिती नव्हते आणि माहीत असलेला शब्द #शॅम्पेन............ ती पण क्रिकेटची मॅच जिंकल्यावर उडविताना पाहिलेली! बाकी गोष्टी मुलांना भीतभितच विचारल्या. अगदी शेवटच्या दिवशी, शेवटच्या क्षणी ही गोष्ट लिहिल आणि ............... ह्या कथास्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला. #प्रथम_क्रमांकाची_ही_माझी_कथा #व्हॅलेंटाईनडे!.... #असाही! व्हॅलेंटाईन डे! तन्वीने आज जाणीवपूर्वक तन्मयच्य...