Posts

Showing posts from February, 2021

स्पर्श मायेचा

Image
#स्पर्श_मायेचा ! शांत झोपलेल्या मुक्ताकडे प्रेमाने बघत सौरभ आवाज न करता, हळूच बाहेर आला. "झोपू दे निवांत, हॉस्पिटलमधून यायला खूपच उशीर झाला होता." असे मनाशी म्हणत सौरभ स्वयंपाक घरांत आला. शांताबाईंची सकाळची कामे आवरली होती. प्रसन्न हसून त्यांनी सौरभला म्हटले, "अरे काल मुक्ताची खूप धावपळ झाली. रात्री इमर्जन्सी आल्याने उशीर झाला. आज तिला मी सांगणार आहे थोडी विश्रांती घ्यायला. फार दमून गेलीय पोर."  " आई! मी हाच विचार करत होतो, मी बोलणार इतक्यात तू बोललीस" हसत सौरभ म्हणाला. चहा घेता घेता मायलेकरांच्या गप्पा सुरु होत्या. विनायकराव मराठे चिखली गावातील संपन्न व्यक्तिमत्व ! भरपूर शेती आणि अनेक छोटे मोठे उद्योग. अतिशय सज्जन आणि पापभिरु. सदैव मदतीस तयार. शेतातील आणि कारखान्यातील लोकांवर अतिशय प्रेम. शांताबाईंची त्यांना चांगली साथ होती. गावांतील बायका हक्काने त्यांच्याकडे मदत मागायच्या. सौरभ आणि विशाखा ही त्यांची मुले. दोघेही हुशार आणि नम्र. अगदी आईवडिलांसारखी. विशाखा सासरी सुखात होती आणि डॉक्टर झाल्यावर सौरभने गावातच हॉस्पिटल सुरू केले होते. मुक्ता अगदी ...