दार उघड माई !

#चित्रकाव्यपूर्ती2

दार उघड माई !


आणली आज पपई
खास तुझ्या आवडीची
उतरवली टोपली डोक्यावरची
वाट तुझी पहाते केव्हाची

जाण आहे परिस्थितीची
तू ही नाही श्रीमंताकडची
आज जरूर आहे मदतीची
भागव आज वेळ निकडीची

तू करता टोपली रिकामी
येतील चार पैसे हाती
घेऊन जाईन दाणा पाणी
पिले आहेत ग माझी उपाशी

रोजचीच ही कहाणी
कधी पपई तर कधी केळी
कधी मिळतो पैका 
तर कधी चंची माझी रिकामी

दार उघड माई, ओ माई
घरी नाही दुसरे कोणी
वाट बघतात कच्ची बच्ची 
मला जायची आहे घाई

दार उघड माई दार उघड
नाही ग आता मला सवड
जाण ना ग माझी निकड
दार उघड माई दार उघड

स्मिता बर्वे

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

आठवते बालपण