आठवते बालपण
#काव्यपूर्ती
#आठवते_बालपण
मोदीजींनी जाहीर केला 21 दिवसांचा लॉकडाऊन
कस करू नी काय करू सगळे बसले सरसावून
ना येणार सखुबाई ना येणार रामा गडी
रोजचा राम रगाडा, जाणार कशी पुढे गाडी
आठवते बालपण, सदा हसतमुख तत्पर आई
सडा सारवण, दारात रांगोळी पहाटेच होऊन जाई
केरवारे,अंथरूण पांघरूण सगळं वेळच्या वेळी
पूजा अर्चा होताच तयार असे नैवेद्याची थाळी
आजी भोवती जमायचा सगळा गोतावळा
प्रत्येकाला हवा ताज्या लोण्याचा गोळा
आजोबा थोडे रागीट, कडक आणि शिस्तीचे
धडे देती पाठांतर, पाढे आणि शुद्धलेखनाचे
बाबा असती जरी व्यस्त, चौफेर त्यांचे लक्ष
काही कमी काही जास्त,सदैव तत्पर अन दक्ष
नव्हता थाटमाट, नव्हता पैशाचा खणखणाट
सण, उत्सव, लग्न कार्य व्हायची थाटामाटात
आठवते बालपण, तो रेशमी मजबूत धागा
कुठे,कधी कसा हरवला?आता तुम्हीच सांगा!
स्मिता बर्वे
बेंगलोर
खूप छान 👌
ReplyDeleteबाळपणींच्या आठवणींची सुंदर साठवण.
ReplyDelete