स्मितानुभव #98 निवृत्ती
याजसाठीं केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा ।
30 एप्रिल 2019....
सकाळ पासूनच मन उदास होते. काहीतरी हरवल्यासारखे वाटत होते. हूरहूर वाटत होती. बघता बघता तीन वाजले आणि बँकेत जायला निघालो. 37 वर्षाहून अधिक काळ एका मोठया संस्थेबरोबर असलेले नाते आज कागदोपत्री संपणार होते. कार कॉर्पोरेट ऑफिसच्या दिशेने पुढे पुढे जात होती आणि माझ्या मनातील विचार त्याच वेगाने धावत होते. मनात आले की सिंडिकेट बँक आपल्या आयुष्यात नसती तर.......नकळत डोळे भरून येऊ लागले. पण आता मी स्वतःला बदलेले असल्यामुळे क्षणांत स्वतःवर ताबा मिळवला आणि समारंभात बोलण्यासाठी चार शब्द लिहू लागले.
बदली आणि निवृत्ती हा नोकरीतील अविभाज्य भाग आहे. बदली झाली की चांगले बसलेले बस्तान सोडून,जिवलग सहकाऱ्यांना सोडून नवीन जागी जायचे........ परत... तेच करायला. तेव्हाही खूप वाईट वाटते. त्रास होतो. पण उज्वल भविष्य खुणावत असते. कधी तर बढती आणि बदली असेही असते. नवीन सहकारी मिळणार असतात. त्यामुळे उमेदीने प्रवास सुरु केला जातो.
निवृत्तीचे तसे नसते... चालू प्रवास थांबणार असतो. अनेक वर्षे जपलेले, मिरवलेले नाते आता बदलणार असते. नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग येणारच असतो. तशी मानसिक तयारी सुद्धा झालेली असते. अश्या बऱ्याच बदल्या आणि निवृत्ती मी अनुभवलेल्या आहेत. हे सगळे मी लहान - मोठ्या शाखेत अनुभवले होते. आजची गोष्ट वेगळी होती. आजचा समारंभ कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आणि एमडी, इडी साहेबांच्या हस्ते अनेक उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थित होणार होता.
मी स्वतः स्वेच्छा निवृत्ती स्वीकारताना झाली नाही तेव्हढी घालमेल आज होत होती. आज माझे यजमान सतीश बर्वे यांचा सिंडिकेट बँकेतील शेवटचा दिवस होता. A true Syndian......
विचारात असतानाच ऑफिसमध्ये पोहचलो. इथे येणे मला नवीन नव्हते पण आज भारी वाटत होते. सिक्युरिटीचे सलाम स्वीकारत यजमानांच्या डिपार्टमेंट मध्ये पोहचलो. सगळे आमची वाट पहात होते. पहिल्यांदाच MD सरांच्या केबिनमध्ये गेल्यामुळे इतकी गोंधळून गेले की पुढे काय होते आहे ते समजलेच नाही. तिथे डिपार्टमेंट तर्फे सत्कार करण्यात आला. भारलेल्या स्थितीतच बाहेर आले आणि यजमानाच्या केबिन मध्ये गेले. तिथे फोटोसहित निरोपाचे बॅनर लावले होते.
अनेक जण येऊन शुभेच्छा देत होते, कोणी आभार मानत होते आणि बर्वे सरांचे youngsters तर तुमच्यामुळे आम्ही घडलो म्हणताना थकत नव्हते. हयांच्या popularity ची कल्पना असल्याने हे अपेक्षितच होते. ह्याच्या लाडक्या CCD ( Corporate Credit Department .... कॅफे कॉफी डे नव्हे )चा प्रेमभरा सत्कार स्वीकारून आम्ही मुख्य कार्यक्रमात सहभागी झालो.
प्रथेप्रमाणे ईशस्तवन होऊन कार्यक्रम सुरू झाला. सगळे रुटीन प्रमाणे सुरू होते. निरोप समारंभात सहसा चांगलेच बोलतात. थोडा फार शब्दांचा फरक होतो इतकेच.
38 वर्षांच्या ह्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला गेला.
नकळत माझ्या डोळ्यासमोर त्यांनी केलेले कष्ट,घेतलेली मेहनत, मिळविलेले ज्ञान, त्याग , प्रसंगी कौटुंबिक कर्तव्य बाजूला सारून बँकेचे पूर्ण केलेले काम, सोसलेला विरह... तरळून गेले. क्लार्क ते डेप्युटी जनरल मॅनेजर
आणि Executive Secretary हा प्रवास आणि त्यासाठी प्रत्यक्ष केलेला प्रवास आठवला. जवळजवळ 28 वर्ष हा माणूस 100 ते 150 किलोमीटर प्रवास रोज..... सतत करत होता....तेही कधीही न कुरकुरता.....लोकल, ट्रेन, बस आणि कार! IT चा जमाना नसताना सुद्धा हे 12 तासाच्या वर घराबाहेर असायचे आणि त्यानंतर 14/15 तास.
" He has never used his power to exploit but always became a bridge between top level and others. Successor should follow the path he has laid down." साहेबांचे हे वाक्य कानी पडले आणि सगळ्या कष्टांचे सार्थक झाले असे वाटले. आपापल्या परीने सगळेच कष्ट घेतात, त्रास सोसतात.....जेव्हा भर सभेत एका मान्यवर व्यक्तीकडून मनापासून दाद मिळते तेव्हा वाटते,
याजसाठीं केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥
On 30th April 2019 I witnessed felicitation function of my husband, Deputy General Manager and Executive Secretary of Syndicate Bank......Not only witnessed I was part of it. It was really soothing to hear appreciation from higher ups and top executives of the bank. We are very lucky that we have been felicited by 1st Syndian Mr. Mrutyunjay Mahaptra MD along with EDs of our bank.
भारावलेल्या मनस्थितीत सत्कार स्वीकारला आणि ह्या सुखद आठवणी आणि सगळ्यांच्या शुभेच्छा स्वीकारून निवृत्त कर्मचारी म्हणून (ex- staff)
मार्गस्थ झालो.
ह्या निमित्ताने मी बोललेले चार शब्द:
Respected MD, ED, GMs and all my colleagues
Truly speaking Syndicate Bank is our first love. This great institution is next to God and parents for us.
I appreciate his in-depth knowledge in credit, sincerity, punctuality and hard work.Thank you one and all for supporting him. Wish him a very healthy retired life and hope he will take care of himself. We are Syndians and we will remain Syndians. Thank you.
#smitanubhav 98
Smita Barve
Bangalore.
Comments
Post a Comment