अष्टाक्षरी पाहुणा
पाहुणा
असो बाल असो थोर
कोड किती सांगू त्याचे
मूर्ती लोभवी मनास
खूप कौतुक तयाचे
अग्र पूजा त्याचा मान
गणांचा तो अधिपती
शिव पार्वती नंदन
विघ्नहर्ता गणपती
हवे दुर्वा लाल फुल
लाडू मोदकच खास
हवे वस्त्र कापसाचे
शोभे भवती आरास
घर भरे आनंदाने
दीड दिस ग पाहुणा
क्षण येता परतीचा
दाटे मनी रितेपणा
येतो वाजत गाजत
जातो वाजत गाजत
जीव लावतोच खास
घर त्याचे काळजात
घर त्याचे काळजात
Comments
Post a Comment