अष्टाक्षरी # कवठी चाफा

बळ आले हो पंखात
पिले भुर्रच उडाली
नभ घेतले कवेत
मागे एकटी माऊली

पिले असताना सान
होई लहान अंगण
सवे ग कवठी चाफा
होती सुखाची गुंफण

नाही उरले काहीच
वाट पाहती दोघेही
रिक्त वाडा अन चाफा
ओढ सदा मनमोही

एके दिनी नवलच
दरवळला सुगंध
मन येई मोहरून
आठवाने मन धुंद

यशासवे परतला
आई हाक प्रेमभरी
गेला पडदा विरून
पिलू बिलगता उरी

©स्मिता बर्वे

बेंगलोर

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण