स्मितानुभव #73 दादांचा 80 वा वाढदिवस

आज सकाळीच फेसबुकवर तीन वर्षांपूर्वीचा फोटो पॉप अप झाला आणि नकळत मन हैद्राबादला पोहचले.
आम्ही मुलांनी त्यांचा 80 वा वाढदिवस कसा साजरा केला... ते आधीच सहज म्हणून लिहून ठेवले होते. तेच आज पोस्ट करावेसे वाटले.
आईवडीलांच्या मुलांकडून छोट्याश्याच अपेक्षा किंवा इच्छा असतात, पण मुले ते पूर्ण करू शकली तर तो कायमचा, मोठ्ठा SSSSS आनंदाचा ठेवा होतो हे नक्की!

असा झाला दादांचा 80 वा वाढदिवस

खूप वर्षांपूर्वी दादा (आमचे वडील)म्हणाले होते, की एकदा सगळे मिळून रामोजी फ़िल्म सिटी बघायला जावे अशी माझी इच्छा आहे.
आम्हां सगळ्यांच्या मनात हे कोठे तरी होतेच. ह्यावर्षीचा 80 वा वाढदिवस होता. साधारण मार्च मध्ये तो हैद्राबादला करावा असे मनात आले. मी लगेच नीता,गीता आणि मंदार ला फोन केला. तिघेही जण क्षणाचाही विचार न करता हो म्हणाली. त्याच प्रमाणे तिसऱ्या पिढीने पण ही कल्पना उचलून धरली.
मग विचार सुरू झाला कि कसे जायचे? कुठे रहायचे? रामोजीला कसे जायचे? Internet मुळे बरेच काम सोपे झाले. बराच शोध घेतल्यावर Hotel Fortune Residency Abids final केले.
25 Sept ला सकाळी पुण्याहुन 8 जण आणि आम्ही बंगलोरहून 6 जण दादांनासह हैद्राबादला पोहचलो. दादांना हे सगळे अनपेक्षित होते. सगळ्यांना एकत्र पाहून दादा खूप खूष झाले.

वेगळ्या ठिकाणी असल्यामुळे वाढदिवस साजरा करण्यावर बंधने होती. म्हणून जरा वेगळ्या तऱ्हेने कार्यक्रमाची आखणी केली होती.

सगळ्यांनी दादांच्या आवडत्या निळ्या रंगाचे कपडे घातले होते. ओवाळण्याची तयारी घेऊन गेलो होतो. केक ऑनलाइन अॉर्डर केला.

साधारण ११.३०ला कार्यक्रमाला सुरवात केली. प्रथम औक्षण केले. नंतर केक कापला. केकवर सर्व family members च्या फोटोचे kolaj केले होते. नंतर करमणूकीच्या कार्यक्रमाला सुरवात केली.

##सुप्रभात

80.1 am पुणे आकाशवाणी केंद्राच्या साठेकॉलानीतील ॐ सदन उपकेंद्रावरून मी स्मिता प्रभाकर बेहेरे आजच्या विशेष दिनी आपणा सर्वांचे स्वागत करते.

आज भाद्रपद शुद्ध द्वादशी शके १९३७  दिनांक २५ सप्टेंबर २०१५

आजचा सुविचार....केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

आजचे भविष्य...आज सूर्याचे भ्रमण सर्व राशीत असल्यामुळे आजचा दिवस सगळ्यांना शुभ आणि लाभदायी असणार आहे.

शुभरंग .......निळा

पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजचे वातावरण आनंदी प्रसन्न आणि अतिशय उत्साहचे राहील.
आताच हाती आलेल्या बातमी नुसार
आज जेष्ठ आणि श्रेष्ठ श्री.दादा बेहेरे 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यातून त्यांची मुले सुना जावई नातवंडे आणि पणती हैद्राबाद येथे जमली आहेत. चला! साक्षीदार होऊया ह्या आंनद सोहळ्याचे.....

हा दिवस संस्मरणीय होण्यासाठी खालील कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

1.प्रभात फेरी आणि फुले आणणे.
2.ब्रह्मविद्येचा पाठ
3.राम नामाचा जप,देवपूजा आणि पोथी वाचन
4.ग्रंथलयाचे उदघाटन
5.सहकुटुंब भोजन,वामकुक्षी आणि whatsapp/       फ़ेसबुक  msg ला प्रतिसाद
6.ह्या विशेष दिवसासाठी zee मराठी ने विशेष नाटकाचे आयोजन केले आहे.....कथा कुणाची व्यथा कुणा
7.कॉफीपान
8. ब्रिज आणि कँरम स्पर्धा
9.विविध गुण दर्शन
10.स्पर्धा करायची म्हणून कलर्स मराठीने अंमलदार ह्या नाटकाचा प्रयोग ठेवला आहे.

ह्यानंतर आइसक्रीम पार्टी होवून आजचा कार्यक्रम समाप्त होईल.(ह्यात दादांना आवडणाऱ्या गोष्टी,ते पुणे वेधशाळेत कार्यरत होते,त्यांनी काम केलेल्या नाटकांची नावे आणि त्यांचा दिनक्रम घेतला आहे).

* स्नेहाने मी लिहिलेली दादांवरची विनोदी कविता     सादर केली.

* हर्षदने mathematical quiz केले होते.त्याचे उत्तर दादांची जन्मतारीख येत होती

* मृण्मय ने गाणे म्हटले.

* दादांच्या जीवनशी निगडित गोष्टी विचारात घेऊन शब्दकोडे तयार केले होते. सोडविताना सगळ्यांना मजा आली.

*दादांना TV serials बघायला आवडतात. म्हणून मलिकांच्या शीर्षक गीतांची melody नातवंडानी सादर केली.

*प्रत्येकाने दादांची मजेशीर आठवण सांगितली.

* शेवटी दादांसाठी rapid fire round ठेवली होती.

दोन अडीच तास कसे गेले समजलेच नाही.
संध्याकाळी खूप पाऊस आल्याने बाहेर जाऊ शकलो नाही. गप्पा गोष्टी,गाण्याच्या भेंड्या ह्यात वेळ कसा गेला ते समजले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर "रामोजी फिल्म सिटी" बघायला गेलो. खूपच मोठे आवार आहे. जागोजागी चढउतार आहेत. ह्या वयातही दादांनी चालत सगळे बघितले. खूप मज्जा आणि मस्ती करून रात्री उशिरा हॉटेलवर आलो.
ह्या सुखद आठवणी मनांत घोळवत सगळे मार्गस्थ झाले.
#smitanubhav 73

Comments

Popular posts from this blog

छोटीसी आशा !

दार उघड माई !

आठवते बालपण