विठूराया स्वप्नात आला संगे होता एका तुका ज्ञाना
माणुसकीला जागा जपा मुके जीव वृक्ष वेलींना
लिहिले भारुड अभंग तरी प्रकाश काही पडेना
पसायदान देऊ तरी कसे प्रश्नच पडला माऊलींना
#काव्यपूर्ती #आठवते_बालपण मोदीजींनी जाहीर केला 21 दिवसांचा लॉकडाऊन कस करू नी काय करू सगळे बसले सरसावून ना येणार सखुबाई ना येणार रामा गडी रोजचा राम रगाडा, जाणार कशी पुढे गाडी आठवते बालपण, सदा हसतमुख तत्पर आई सडा सारवण, दारात रांगोळी पहाटेच होऊन जाई केरवारे,अंथरूण पांघरूण सगळं वेळच्या वेळी पूजा अर्चा होताच तयार असे नैवेद्याची थाळी आजी भोवती जमायचा सगळा गोतावळा प्रत्येकाला हवा ताज्या लोण्याचा गोळा आजोबा थोडे रागीट, कडक आणि शिस्तीचे धडे देती पाठांतर, पाढे आणि शुद्धलेखनाचे बाबा असती जरी व्यस्त, चौफेर त्यांचे लक्ष काही कमी काही जास्त,सदैव तत्पर अन दक्ष नव्हता थाटमाट, नव्हता पैशाचा खणखणाट सण, उत्सव, लग्न कार्य व्हायची थाटामाटात आठवते बालपण, तो रेशमी मजबूत धागा कुठे,कधी कसा हरवला?आता तुम्हीच सांगा! स्मिता बर्वे बेंगलोर
#चित्रकाव्यपूर्ती2 दार उघड माई ! आणली आज पपई खास तुझ्या आवडीची उतरवली टोपली डोक्यावरची वाट तुझी पहाते केव्हाची जाण आहे परिस्थितीची तू ही नाही श्रीमंताकडची आज जरूर आहे मदतीची भागव आज वेळ निकडीची तू करता टोपली रिकामी येतील चार पैसे हाती घेऊन जाईन दाणा पाणी पिले आहेत ग माझी उपाशी रोजचीच ही कहाणी कधी पपई तर कधी केळी कधी मिळतो पैका तर कधी चंची माझी रिकामी दार उघड माई, ओ माई घरी नाही दुसरे कोणी वाट बघतात कच्ची बच्ची मला जायची आहे घाई दार उघड माई दार उघड नाही ग आता मला सवड जाण ना ग माझी निकड दार उघड माई दार उघड स्मिता बर्वे
Comments
Post a Comment