स्मितानुभव#8 मला भावलेले- चंदिगढ
मागच्या वर्षी आम्ही दिल्लीला होतो. सलग तीन दिवस सुट्टी होती म्हणून चंदीगडला जायचे ठरवले. तिथे आमचे खूप जुने मित्र कपल राहते. ती दोघे पण आग्रह करत होती. जवळपास 30 वर्षानी आम्ही भेटणार होतो.
चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे. रेल्वे स्टेशन हरियाणात आहे. स्टेशन वरून घरी जाताजाताच
तिथल्या संपन्नतेची जाणीव झाली. चंदीगड ही पंजाब आणि हरियाणा ची संयुक्त राजधानी आहे.
हे स्वतंत्र भारतातील पाहिले नियोजित शहर आहे.
लांब रुंद रस्ते दोन्ही बाजूनी विविध फुलांनी नटलेले होते. सगळी कडे एकप्रकारची शिस्त जाणवत होती.
तिथे जास्त करून दुमजली घरे आहेत. प्रत्येक सेक्टर मध्ये उत्तम बाग आहे. घराची रचना अशी आहे की प्रत्येक घरातून बागेचे मनोहारी दृश्य दिसेल. सेक्टर नंबर आणि घर नंबर व्यवस्थित लिहिलेले आहे. प्रत्येकाने आपल्या समोरच्या बागेची काळजी घ्यायची.
आवर्जून बघावे असे आहे सुखना लेक आणि रॉक गार्डन.
लेक कसेही असेल तरी सुंदरच वाटते, हे तर इतके विस्तिर्ण आहे की डोळ्यात मावत नव्हते.
रॉक गार्डन हे टाकाऊ वस्तू पासून बनविलेले आहे.
त्यात खूप कलात्मकता आहे असे नाही पण नको असलेल्या गोष्टींचा वापर असाही करू शकतो हा विचार मनाला भावला. फुटकी मडकी, विजेची बटणे, बांगडयाच्या फुटलेल्या काचा, फुटलेला कप आणि बशी अशी खूप मोठी लिस्ट आहे. काय काय वापरले आहे ते शोधण्यात वेळ मजेत आणि किती गेला ते कळलेच नाही.
मैत्रिणी कडून कळले रोज सकाळी दर एक तासाने दुध,ब्रेड,अंडी अश्या गरजेच्या वस्तू दारावर विकायला येतात. उत्तम जेवण आणि उत्तम मित्रांच्या सहवासात दोन दिवस कसे गेले ते कळलेच नाही.
एकूण शहर शांत आणि समृद्ध आहे.
विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे किलोमीटर प्रमाणे किती वेळ लागेल ह्याचा अंदाज कधीच चुकत नाही.
Comments
Post a Comment