स्मितानुभव #58 गुरुपौर्णिमा
मातापिता असती प्रथम गुरू,थोरवी त्यांची काय वर्णू
तन मन अर्पूनी शिकविती त्या गुरुंसाठी काय म्हणू
आजचे माझे यश कीर्ती ही आपल्या श्रमांची हो पावती
जगण्या लायक केले नतमस्तक मी सदा चरणावरती
कोणी शिकवितो वागावे कसे कोणी कसे नको ते
गुरू हो तुम्ही दृष्टी दिली नीरक्षीर कसे ओळखावे ते
भेटती गुरू अनंत रूपे पावलो पावली क्षणोक्षणी
कधी असतात सहकारी तर कधी मित्र मैत्रिणी
बालादपि सुभाशितम ग्राह्यम् त्यांचीही थोरवी मोठी
निसर्ग असे गुरूंचा गुरू झटू त्याच्या संवर्धनासाठी
नेईन पुढे हाच वारसा,घेईन परिश्रम घडविण्यासाठी
हिऱ्याला पाडीन पैलू आशिर्वाद असावा सदासाठी
Comments
Post a Comment