स्मितानुभव #54 तेरा साथ

काल तारीख होती '13/7 ....तेरा साथ"

मी ती अनोख्यारीतीने अनुभवली. आयुष्यात जोडीदार,मुले,नातवंडे,नातेवाईक महत्वाचे असतातच......परंतु जीवनातील बराच मोठा भाग व्यापलेला असतो,तो आपण काम करत असलेल्या संस्थेने आणि तिथल्या सहकारी मित्र मैत्रिणींनी.

एकत्र काम करता करता ते नाते, नातेवाईक आणि मैत्री ह्या पलीकडे पोहचते. असे बंध जुळतात की त्याला काही टॅग नसतो. स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. एकत्र केलेले काम आणि एकत्र घालवलेला वेळ हा आयुष्याचा, कायमचा अविभाज्य भाग बनलेला असतो. 
बँकेची नोकरी म्हणजे  बदली. सरळ समीकरण. त्यात सरकारी बँक म्हणजे भारतात कुठेही बदली. 

तर 33 वर्षापूर्वी चिंचवडला एकत्र काम केलेले आम्ही चौघेजण आज बंगलोरला भेटलो. Again  thanks to Facebook and WhatsApp....
पुण्याहून दोघीजणी मुद्दाम भेटायला आल्या आहेत. ओढ असली की इतर कशाचाच अडथळा वाटत नाही हेच खरं.

काळाच्या भिंती अश्या गळून पडल्या कि असे वाटले पूर्वी सारखेच कामाबद्दल चर्चा करायला जमलो आहोत. चिंचवड शाखेत तेव्हा आम्ही 30/ 40जण तरी होतो. भारताच्या विविध भागातून आलेले..... भाषा,आचार विचार,खाण पिणं,पेहराव सगळे वेगळे. विविधतेत एकता! बँक आणि तिच्या वरची नितांत श्रद्धा हीच काय ती सामाईक.

काल नक्कीच बाकी सगळ्यांना उचकी लागली असणार. आठवताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. बरेच सहकारी आता निवृत्त झाले आहेत. सगळे स्थिरावले आहेत आणि आनंदात आहेत. काही काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
आज सगळ्यांकडे सगळे आहे....नाही आहे तो वेळ! तो आम्ही एकमेकांना दिला.

प्रत्यक्ष भेट झाली नाही तरी मिळालेल्या माहितीनेसुद्धा समाधान वाटले. परत एकत्र आलो तर नवीन स्वतःची बँक सुरु करू असा विश्वास वाटला.....तेरा साथ...😊

पुन्हा एकदा चिंचवडला भेटायचे ठरवून एकमेकांचा निरोप घेतला.

Yesterday's evening was really memorable. Four of us, who used to work together 33 years back, met in Bangalore. Thanks to Jayram Venugopal, Seema Lalla and Anuradha Wakhare...you made my day.😊

#smitanubhav 54

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस