स्मितानुभव #41 Father's Day

आज " Father's Day" नवीन किंवा पाश्चात्य संकल्पना. असेना का. मनातून कितीही आदर वाटत असला तरी आपण कुठे ते सांगतो वडिलांना. आपल्या संस्कृतीत ते गृहीतच आहे.
विचार केला, का बरे असेल असे?

मनाने अगदी क्षणात उत्तर दिले "अग आईवडिलांच्या बद्दल भावना व्यक्त करणारे,त्यांना धन्यवाद देणारे शब्दच नाही आहेत. ही फक्त आणि फक्त वागण्यातून, कृतीतून व्यक्त होणारी गोष्ट आहे. नित्यनियमाने होणारी गोष्ट आहे. त्यामुळे दिवसाचे प्रयोजनच नाही, बरोबर ना?"

माझे वडील माझे दादा

आधी प्रेमळ पिता, मग कडक वडील आणि आता उत्तम मित्र, मार्गदर्शक सर्व काही......
दादा फक्त कृतज्ञता 🙏🙏🙏🙏ह्या सुंदर आयुष्याबद्दल!

#smitanubhav 41

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस