स्मितानुभव #40 बंगलोर आणि पाऊस

बेंगलोर पाऊस कधी येईल ते काही सांगता येत नाही. कालचीच गोष्ट. साधारण संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मी घरातून बाहेर पडले. व्यवस्थित ऊन होते. पावसाचे काहीच चिन्ह नव्हते. रिलायन्स फ्रेशला गेले होते. सामान घेता घेता जरा उशीर झाला. बाहेर माझे लक्षच नव्हते.
बाहेर निघाले तर बाजूचा माणूस म्हणाला की कुठे जात आहात? पाऊस किती येतोय बघा. बघता बघता वादळी पाऊस सुरू झाला. छत्री वगैरे काहीच नव्हती. शेवटी पाऊस थांबे पर्यंत तिथेच थांबले.

पाऊस कमी झाला,पण रिमझिम चालूच होती. थोडीशी भिजत घरी यायला निघाले. सोसयटीत शिरतानांच एक सोळा सतरा वर्षाची मुलगी म्हणाली, " Come aunty will go together! "  तिच्याकडे छत्री होती आणि मी
भिजते आहे हे पाहून तिने मला छत्रीत बोलावले.
ओळख ना पाळख तिच्या आत्मीयतेने मन सुखावले, नकळत स्मित झळकले. मलाही आवडले असते तिच्या बरोबर जायला, पण आमच्या इमारती विरुद्ध दिशेला होत्या. मग नाईलाज झाला.
" So sweet of you! Thank you"  असे म्हणून खुषीतच घरी आले.

नवीन पिढीतील आपुलकी, आदर, प्रेम ,सामंजस्य
अनुभवून खूप बरे वाटले.

# smitanubhav 40

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस