अ ल क#3 सामंजस्य

खूप दिवस तो तिला बघत होता. खरं तर त्याचा जीव गुंतला होता. तिच्याही ते लक्षात आले होते. तिलाही तो मनापासून आवडला होता. नजरेनेच बोलायचे दोघे. एक दिवस धीर करून त्याने विचारले,"दोन तीन वर्षे देशील? सन्मानाने घेऊन जाईन."
"नाही जमणार रे! कौटुंबिक बंधने आहेत. नाईलाज आहे माझा."
दोघांचे डोळे पाणावले. एकदमच बोलले मनातला एक कोपरा सदैव तुझा असेल. सुखी रहा.

नंतर कधीही भेटले नाहीत.....मस्त जगले हळवा कोपरा जपत.

Comments

Popular posts from this blog

आठवते बालपण

दार उघड माई !

छोटीसी आशा !