स्मितानुभव#3 सामाजिक जाणीव


27 एप्रिल हा तर माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस...
आज माझी मुले हर्षद आणि स्नेहा 32 वर्षाची झाली. माझी मुले माझा श्वास आहेत.
सगळ्या अडीअडचणीवर मात करत, ईश्वर कृपेने, थोरामोठ्याच्या साथीने आणि आशीर्वादाने, मावशी मामाच्या कौतुकात, शेजारच्याच्या मदतीने लहानाची मोठी कधी झाली ते कळलेच नाही.
आज मी अभिमानाने सांगू शकते की दोघेही सुजाण नागरिक आणि उत्तम माणूस आहेत.
दोघांनीही कॉम्पुटर इंजिनीरिंग केले आणि कॅम्पस सिलेक्शन  होऊन चांगली नोकरी पण मिळाली.
पण हा आजचा मुद्दा नाही....
त्यांना वाढविताना मी एका गोष्टीकडे कायम लक्ष दिले की त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहतील, थोडयाशा यशाने ती हुरळून जाणार नाहीत.
पहिला पगार झाल्यावर मी त्यांना सांगितले की तुम्ही इथपर्यंत पोहचण्यात अनेक जणांचा हातभार लागला आहे. हे यश तुमच्या एकट्याचे नाही. तरी तुम्ही काही छोटी मोठी भेट वस्तू देऊन कृतज्ञाता व्यक्त करा. त्या प्रमाणे त्यांनी केले सुद्धा!
दुर्दैवाने त्यांचे हे यश बघायला माझी आई आणि आजी दोघीही नव्हत्या. खरं तर मुलांच्या संगोपनात त्या दोघींचा फार मोठा वाटा होता, कारण मी नोकरी करत होते. मुलांचाही दोघींवर खूप जीव होता. दोघींच्या नावाने योग्य संस्थेला देणगी द्यायचे ठरले.
माझी मावशी सांगली जिल्ह्यातील जत ह्या गावी रहाते. मुलांच्या संगोपनात तिचापण सहभाग होता, तिला भेटायला म्हणून आम्ही जतला गेलो.
जत दुष्काळी भाग आहे. तिथे बघण्यासारखे किंवा आवर्जून भेट देण्यासारखे काही नाही.
मावशी म्हणाली "चल जरा एका शाळेत जाऊन येऊ, आज माझ्या सासूबाईंचे श्राद्ध आहे म्हणून खाऊ देऊन येऊ."
ती शाळा दिव्यांग मुलांची होती. शाळेबद्दल सविस्तर सांगणे आवश्यक आहे म्हणून दोन भागात हा अनुभव सांगते.
#smitanubhav

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस