अ ल क#2 समाधान

तो तिच्या समाधानी चेहऱ्याकडे एकटक पहात होता. कशाची बनली आहे ही!

त्याला 25 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. लग्नाला एक महिना पूर्ण झाला होता. काहीतरी खास द्यावे वाटत  होते, पण खिसा परवानगी देत नव्हता. विचार करून,शोधून त्याने बकुळीचा गजरा घेतला. तिला देताना अपराधीवाटून म्हणाला " आज इतकंच "  ती समाधानाने हसली.

आज तिला सोन्याचा बकुळहार दिला तरीही तेच समाधान?

वेडाच आहेस तू ! काय दिलेस त्यावरून का मी तुझ्या प्रेमाची किंमत करणार आहे? तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आज न उद्या मी सोडून आलेले वैभव तू मला मिळवून देणार! खात्री आहे मला.

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस