स्मितानुभव# 27 मानसी
ह्या लिखाणाचा मला खूप फायदा होत आहे.
नवीन ओळखी होत आहेत.अनुभवातून अनुभव मिळत आहेत. बऱ्याच जणांच्या स्मृती जाग्या होत आहेत तर कुणाला पुनः प्रत्ययाचा अनुभव मिळतो आहे. कोणी अभिप्राय देते आहे तर कुणी व्यक्तीगत मेसेज देते आहे.
काल मी उल्लेख केला की "मानसी बापट" मुळे
मला वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपची माहिती झाली.
त्याच पैकी स. न .वि .वि हा एक ग्रुप. ह्या ग्रुपच्या अडमीन Shraddha Soudikar ह्यांनी मला आवर्जून सांगितले असेच लिहीत रहा वाचायला आवडेल.
कालच्या माझ्या पोस्टमुळे मानसीला सुद्धा खूप फोन आणि अभिप्राय मिळाले. ती मुळातच मनाने चांगली असल्याने एकदम भारावून गेली आणि तिने माझ्या साठी ही भावपूर्ण कविता पाठवली.
स्मिता
कळलेच नाही कधी जुळली मैत्रीची तार
तुझ्यामुळे आयुष्य झाले अजून बहारदार
सतत जगत आलीस दुसऱ्यांसाठी
आता मात्र जग स्वतः साठी
आहेस तू खूपच लाघवी
म्हणूनच वाटतेस सर्वांना हवी हवी
सखा तुझा आहे मस्त
जग आता त्याच्या बरोबर बिनधास्त
करू नकोस पर्वा जगाची
तुला ही आहे आयुष्य घे चव त्याची
विसरणार नाही कुणीच कधी आपली दोस्ती
करू दोघी मिळून थोडीशी मस्ती
जुळून आल्या आपल्या अनोख्या रेशीमगाठी
जीवाची ही करणार नाही पर्वा तुझ्यासाठी
लिहीत रहा असेच तुझे अनुभव,तुझ्या भावना
पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझीच सखी
मानसी.
आता सांगा ह्या सुंदर कवितेला तसेच उत्तर नको का?
मानसी
इतके सुंदर कोणी लिहिले नाही माझ्यासाठी
कधीच विसरणार नाही आपल्या भेटी गाठी
हेच ते ऋणानुबंध ह्याच त्या दृढ रेशीम गाठी
मानसी हे नाव असेल माझ्या मनी आणि ओठी
आयुष्य खूप सुंदर आहे घेईन प्रत्येक क्षण लुटून
समाधानी आहे सतीशसह गेले आहे सुखावून
दुसऱ्यांसाठी जगण्याचा वारसा आला रक्तातून
त्यातही आंतरिक शांती, घेतली आहे समजून
प्रवाहा विरुद्ध पोहताना धडपड होते खूप
म्हणून समजावते स्वतः ला राहते गपचूप
सर्व सुखे दिली देवाने नसे इच्छा नाही सुप्त
नको करुस सखे माझी चिंता, मी आहे तृप्त
😢😢आनंदाश्रू 🙏🏻🙏🏻🙏🏻
तुझीच सखी
स्मिता
#smitanubhav 27
Comments
Post a Comment