स्मितानुभव #26 स्मितानुभव

आज अनुभव स्मितानुभावाचा

हे लिखाण मी ठरवून सुरू केले नाही.

खरं तर बेंगलोर येऊन मला 8 वर्षे झाली आहेत. पण या ना त्या कारणाने मी येथील मराठी मंडळ आणि त्यांच्या इतर कार्यक्रमात सक्रिय भाग घेऊ शकले नाही किंवा कोणाशी संपर्क पण साधू शकले नाही. "बेंगलोर मराठी "असा फेसबुकवर ग्रुप आहे,त्याची मी सदस्य झाले. जानेवारी मध्ये देशपांडे दाम्पत्याशी ओळख झाली.

8 मार्च ला BM नारीशक्ती असा whatsapp  ग्रुप त्यांनी सुरू केला. मला पण त्यांनी मेंबर केले. खरं त्या ग्रुप मध्ये माझ्यापेक्षा लहान मुली आहेत, पण त्यांनी मला पण ऍड केले. सात दिवसाचे विषय ठरलेले आहेत त्या प्रमाणे त्या ग्रुपवर विचारांचे आदान प्रदान होते.
ह्या ग्रुपमुळे " मानसी बापट " व्यक्तीमत्वाशी ओळख झाली. बोलता बोलता चिंचवडची ओळख निघाली आणि कधी मैत्री झाली ते कळलेच नाही.
मी स्वतःला सोशल मीडियाची राणी समजत होते पण मानसी बाप आहे. तिने वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मला ऍड केले आणि माझे वाचन वाढले.

Whatsapp  ग्रुप मधील मुली मला म्हणू लागल्या की काकू तुमचे अनुभव शेअर करा ना! मी म्हटले 
"अग आमचे अनुभव आता टाईमबार झाले आहेत. आमच्यावेळच्या आणि आताच्या परीस्थितीतजमीन अस्मान फरक आहे. आम्ही एक हजार रुपयात महिना काढत होतो हे तुम्हाला खरं तरी वाटेल का? त्या पेक्षा तुम्ही एक विषय द्या त्यावर मी लिहिते." मुली म्हणाल्या की विषय तुम्हीच सुचवा.
सगळ्यांची मुले तशी लहान आहेत म्हणून मी म्हटले चला विषय " बालहट्ट " आणि मी  पहिला अनुभव लिहिला.
तसे प्रसंगानुसार मी लिहीत असे. मुलांना वक्तृत्व स्पर्धेसाठी, नाट्यछटा स्पर्धेसाठी लिहून पण देत असे . पण तेव्हा लिखाणासाठी वेळ पण नव्हता आणि माध्यम पण नव्हते.

प्रथम असा विचार केला की सात विषय निवडावेत आणि दररोज त्यानुसार लिहावे. तसे दोन तीन दिवस लिहिले सुद्धा. मग title ची कल्पना आली आणि " स्मितानुभव " लिहायला सुरुवात झाली.
एक दोन लेख वाचून दिपालीने # ( हॅश टॅग ) करण्याबाबत सुचविले आणि बघता बघता 25 लेख झाले. मला कल्पना आहे की फार मोठी गोष्ट नाही, पण ह्या निमित्ताने मला दिलेल्या उत्तेजनाबद्दल,अभिप्रायाबद्दल,कौतुकाबद्दल धन्यवाद द्यावेसे वाटले.

अभिप्राय वाचून खूप भारी वाटले. अभिप्रायामुळे नवीन कल्पना पण सुचतात. आपलं लिखाण आवडत आहे हे बघून उत्साह वाढला आहे.

मी लिहीत राहीन .....आपण वाचत रहा

                     🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस