स्मितानुभव #2दिव्यत्वाची प्रचिती






जून 1998 सालची गोष्ट आहे.माझी आई खूप आजारी होती. ती पुण्याच्या KEM हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती. मी माझ्या 12 वर्षाच्या दोन मुलांना घेऊन चिंचवड ला राहत होते. यजमान आंध्रप्रदेशातील एका खेड्यात होते. शाळा असल्यामुळे मला पुण्याला राहणे शक्य नव्हते. म्हणून मी बँकेतून सुट्टी घेऊन दिवसभर आईपाशी थांबायची आणि रात्री घरी जायची. भाऊ आला की मी हॉस्पिटल मधून निघायची. एक दिवस भाऊ जरा लवकर आला. आई त्याला म्हणाली" मिलिंद तिला स्टेशन वर सोडून ये, लोकलने ती लवकर पोहचेल, मुलं एकटीच असतात वाट पाहत असतात." खरं तर मी बसनेच प्रवास करणारी पण लवकर पोहचू म्हणून निघाले.

तिकीट काढतानाच विचारले कि लोकल कितव्या platform वर येते म्हणून, त्यांनी सांगितले 10 वर. लोकलला पाच सात मिनिटेच उरली होती. काहीही न बघता मी शेवटच्या प्लॅटफॉर्म कडे पळत सुटले. बघते तर शेवटचा No.9 होता. काय करावे ते कळेना. एका माणसाला विचारले 10 नंबर कुठे आहे ते. तो म्हणाला पहिल्या प्लॅटफॉर्मच्या शेवटी 10 No आहे, असे म्हणून त्याने बोट दाखविले.......... बघा ती लोकल सुटली.
मला लोकल मिळणे शक्यच नव्हते तरी मी जीवाच्या आकांताने धावत सुटले मनात म्हटले, "काय रे देवा! हे तू काय केलेस ना मी माझ्या आईजवळ ना मुलांजवळ"
आणि काय सांगू तुम्हाला वेग घेतलेली ती लोकल हळू झाली, आणि माझ्या समोर थांबली तेव्हा समोर लेडीज डबा होता आणि समोरच पुणे शाखेतील 2 मैत्रिणी होत्या.
मी मनोमन देवाचे आभार मानले, जणू त्याने त्याचे माझ्याबरोबर असणेच मला दाखवून दिले.
आईच्या तब्बेतीचे कमी जास्त सुरूच होते, पण नंतर ती घरीच होती.
नंतरच्या मे महिन्यांत, यजमानांची बदली मुंबईला झाल्यामुळे आम्ही वाशीला राहायला जाण्याचे ठरविले. माझी जुळी मुले आहेत, त्यांना आठवीत admission घ्यायची होती, एकदम दोन सीट कुठल्याच शाळेत नव्हत्या आणि ती वेगवेगळ्या शाळेत जायला तयार नव्हती. काय करायचे ते समजतच नव्हते. रात्री आकाशा कडे पाहून मी मनातल्या मनांत म्हणाले "देवा जर मी आईची मनापासून सेवा केली असेल तर मुलांची admission होऊ दे" आणि खरंच दुसरे दिवशी वाशीची प्रसिद्ध शाळा फादर अग्नेल मधून मिस्टरांना फोन आला, 2 सीट आहेत उद्या सकाळी येऊन ऍडमिशन घ्या.

ह्या घटनेचे सगळ्यांना आश्चर्य वाटले, कारण तिथे सहज ऍडमिशन मिळत नाही. ईश्वर कृपेने 12 वी पर्यंत दोघांचे ही शिक्षण तिथेच झाले.

पोस्ट थोडी लांबली आहे तरी सुद्धा शेवटचे

नोव्हेंबर 1999 ला माझ्या सौ.आईचे दुःखद निधन झाले. तिच्या आजारपणात ज्ञात अज्ञात लोकांची खूप मदत झाली. त्या सगळ्यांचे मी आज आभार मानते.
#smitanubhav 2

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस