अ ल क #1 मार्जिन
वाफाळलेला कॉफीचा मग हातात घेऊन ती सुस्त बसून होती. समोर वहीची पाने फडफडत होती. कालच तिसऱ्या घराच्या वास्तुशांतीला आलेले सगळे पाहुणे परत गेले. तिच्या नवऱ्याचे, मुलगा सुनेचे सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केले. तिच्या नवऱ्याच्या कर्तृत्वाचा तिलाही सार्थ अभिमान होता. तिला वाटले आपण ह्या वहीच्या मार्जिन सारखे आहोत. आहे म्हणून पानाला शोभा आहे, बाकी काही उपयोग नाही. प्रत्येक वेळी मार्जिन amount आपण द्यायची आणि कौतुक बाकीच्यांचे! कर्तृत्व इतरांचे!
अरे बाबांनो मार्जिन मनी नसेल तर होईल का रे काही साकार?.....तिचे मन आक्रंदत होते....
Comments
Post a Comment