स्मितानुभव #18 मला भावलेले लंडन 5
लंडनला गेल्यापासून लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे तिथली शांतता! गर्दी असली तरी गोंधळ नाही. मी तिथे असे पर्यंत तीन चार वेळा संप झाले. एक शिक्षकांचा होता. जो संपावर होता त्याचा मेसेज पालकांना आला होता, मुलांना शाळेत पाठवू नये असा. जे शिक्षक संपावर नव्हते त्यांनी शाळेत आल्याबद्दल मुलांना thank you म्हटले. दोनदा बसचा झाला आणि एकदा तर Tube चा झाला. सगळे आधीच जाहीर केलेले होते, त्यामुळे कुठेही गडबड गोंधळ नव्हता.
लंडनच्या महापौर पदाची निवडणूक झाली.कुठेही पोस्टर नाही की मिरवणूक, रॅली काहीही दिसले नाही.
बसचा एक नवीन रूट सुरू झाला. त्याबद्दलची सविस्तर माहिती सर्व बस स्टॉपवर आधीच लिहिलेली होती. बस ज्या दिवशी पासून सुरू झाली, त्या दिवशी तो बस नंबर सर्व स्टॉप वर लिहिलेला होता आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले, मोबाईल अँप,सगळीकडे ही माहिती update केलेली होती.
सगळीकडे पार्किंग पेड आहे. काही इव्हेंट असेल तर तसे बोर्ड सगळीकडे आधीच लावतात.
शाळेत कवितेतून लंडन ब्रिजशी ओळख झाली होती, त्यामुळे तो बघायची उत्सुकता होती. थेम्स नदीचे विशाल पात्र आणि नवीन बांधलेला टॉवर ब्रीज, त्याचप्रमाणे लंडन आय, बिग बेन, वेस्टमिनिस्टर, बकिंगहॅम पॅलेस, शेक्सपिअर ग्लोब हे पण सगळे पाहिले. भव्यता आहे पण कारागिरी नाही आढळली.
Durdle door... आणि Bournemouth हे बीच पण पाहिले.
Syndicate Bank लंडन ब्रँचला भेट दिली. आणखीन एक स्वप्न पूर्ण झाले.
फक्त भावलेले लिहायचे आहे म्हणून.....
एक मात्र खरं...
"सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा"
#smitanubhav 18
Comments
Post a Comment