स्मितानुभव#15 मला भावलेले लंडन 2

        "LONDON UNDERGROUND"

संपूर्ण लंडन रेल्वेने जोडलेले आहे. इकडे ट्रेनला TUBE म्हणतात. ट्युब स्टेशनस् अगदी भर वस्तीत आहेत. कळतसुद्धा नाही की हे रेल्वे स्टेशन आहे म्हणून. बस स्टॉप आणि ट्युब स्टेशन अगदी जवळ जवळ आहेत. जमिनीखाली 3 ते 4 लेव्हल खालून ही ट्युब जाते. सर्वात जलद वाहतुकीचा मार्ग आहे हा.

एकूण 11 लाइन आहेत. सगळ्या एकमेकांना व्यवस्थित जोडलेल्या आहेत.
ट्युबचा MAP सुद्धा खूप सुंदर आहे. त्यावर सर्व तपशील आहेत. पार्किंग आहे की नाही?अपंगांसाठीच्या सुविधा आहेत की नाही?सामायिक स्टेशन कुठले? इत्यादी. कितीतरी वेळा मी timepass म्हणून तो मॅप वाचत बसले आहे.
अगदी नवखा माणूस सुध्दा शहरात आरामात प्रवास करू शकतो, इतके तपशील उपलब्ध आहेत.

मॅप नसला तरीही काही अडचण येत नाही. सर्व स्टेशनवर व्यवस्थित बोर्ड लावलेले आहेत. गोंधळ गडबड व्हायला काही जागाच नाही.
प्रत्येक स्टेशनची announcement होत असते. स्टेशन कुठले आहे ? ते कोणत्या मार्गाला जोडते?जवळचे प्रेक्षणीय स्थळ कोणते? पुढे जाण्यासाठी कुठे उतरावे? अगदी इथंभूत माहिती देतात.

संपूर्ण लंडन 5 झोन मध्ये विभागले आहे.त्याप्रमाणे तिकीट दर आहेत. साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक पास उपलब्ध आहेत. हे oyster कार्ड स्वरूपात असतात. झोन सोडून जायचे असेल तरीही काही अडचण येत नाही. थोडे जास्तीचे पौंड जमा करून ठेवायचे. स्टेशन मध्ये शिरताना swipe करायचे आणि बाहेर पडताना सुद्धा.जसा प्रवास झाला असेल तसे पैसे कट होतात. ट्युबचा पास असेल तर बस प्रवास मोफत आहे. Oyster card नसेल तर क्रेडिट कार्ड सुद्धा चालते.

सगळी कडे सरकते जिने आहेत. जिन्याच्या डाव्या बाजूला उभे राहायचे, उजवीकडची जागा चढून जाणाऱ्यांना. सगळे नुसते पळत असतात. इतके असूनही भरपूर चालावे लागते.

विशेष उल्लेख करण्यासारखी आहे DLR लाइन.
ही ट्युब चालकाविना आहे. पहिल्या सीट वर बसले तर आपणच चालक आहोत असे वाटते.
'BANK' ह्या स्टेशन पासून ही line सुरू होते. पाच किंवा सहा डबे असतात, तितके कर्मचारी साफसफाईचे सामान घेऊन खाली उभे असतात. ट्रेन येताच ते आत चढून साफसफाई करतात, तीन मिनिटात पुढच्या ट्रिप साठी तयार. ही line अक्षरशः दोन बिल्डिंग मधून जाते. इतका सुंदर रूट आहे की काय बघू काय नको असे होते. आता इमारतीतुन बाहेर पडते तर खाली नदी दिसते तोपर्यंत पुढचे स्टेशन येते.

ह्या underground tube चा 155 वर्षाचा इतिहास आहे.टप्याटप्याने सुधारणा होत गेल्या आहेत. ह्याबद्दल विकिपीडियावर खूप छान माहिती उपलब्ध आहे.

आज पहिल्यांदाच वर्णन करायला माझे शब्द कमी पडत आहेत असे वाटले.
खूप पद्धतशीर,नियोजन बद्ध, सामान्य माणसांच्या सोईचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.... Simply Great

#smitanubhav 15

Comments

Popular posts from this blog

दार उघड माई !

आठवते बालपण

स्मितानुभव #84 सर्कस